पुणे सिटीच्या विजयात सेनोरिटा चमकली

0

मुंबई । सामन्यातील पहिल्या हाफमध्ये सेनोरिटा नोंगाप्लुहने नोंदवलेल्या दोन गोलांमुळे एफ. सी. पुणे सीटी संघाने विफा महिला राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत नागपुरच्या तिरपुडे स्पोर्ट्स अकादमीचा 2-0 असा पराभव केला. संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणार्‍या सेनोरिटाने हे दोन्ही गोल अनुक्रमे 14 व्या आणि 27 व्या मिनिटाला केले.

आधार प्रतिष्ठान अव्वल
या विजयामुळे एफसी पुणे सिटी संघाचे सहा गुण झाले असून ते ब गटातून दुसर्‍या क्रमांकाने उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या गटातील अन्य लढतीत आधार प्रतिष्ठान आणि केएसए वुमन्स फुटबॉल क्लब यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. या लढतीअखेर आधार प्रतिष्ठानच्या खात्यात सात गुण जमा झाले असून उपांत्य फेरीत त्यांचा सामना युनायटेड पुना फुटबॉल अकादमीविरुद्ध होणार आहे.