पुणे-सोलापूर रोडवर भीषण अपघात; ९ तरुण ठार !

0

पुणे : पुणे-सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतसमोर मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात 9 तरुण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील सर्व मृत हे यवतचे (ता. दौंड) असून ते रायगडाहून माघारी परतत होते. यावेळी झालेल्या अपघातात त्यांच्या कारचा चेंदामेंदा झाला. कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या सर्वांचे मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहेत. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, जुबेर अजित मुलानी अशी मृतांची नावे आहेत.