पुणे । स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत प्लेस मेकिंग या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी सध्या केली जात आहे. याचा एक भाग म्हणून, बाणेरमधील मेडीपॉइंट हॉस्पिटल रोडजवळ सर्वे नंबर 244 या जागेवर, ‘ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधांसह समुदाय शेती’ ही प्लेस मेकिंग संकल्पना साकारण्यात येत आहे.वेगाने होणार्या शहरीकरणामुळे एका बाजूला आपण निसर्गापासून दूर जात आहोत, पण दुसर्या बाजूला निसर्ग पुरवत असलेली विपुल संपत्ती ओळखण्यातही कमी पडत आहोत. बाणेरमधील सर्वे नंबर 244ची बहुविध नैसर्गिक संपत्ती लक्षात घेऊन इथल्या उपलब्ध मोकळ्या जागेचा अत्यंत कल्पक वापर होईल. खुल्या जागेत फळे व भाज्या तसेच औषधी वनस्पतींसाठी सौंदर्यपूर्ण बाग उभारण्यात येणार आहे.समुदाय शेती कृती, गार्डनिंग कार्यशाळा, हास्यक्लब तसेच छोटेखानी कॅफे व समुदाय शेतीची उत्पादने विकण्यासाठी दुकानासाठी जागाही या स्थळांत ठेवण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व आराम, पावसाचे पाण्याची साठवण, समुदाय शेतीतील पालापाचोळा- कचर्यापासून जैवित खत निर्मिती (तशीाळिेीीं -ीशर), सौर उर्जेचे पॅनेल्स, एक्यूप्रेशर पथ (ठशषश्रशुेश्रेसू झरींहुरू) इत्यादीसाठी जागाही इथे ठेवण्यात येणार आहे.
जागतिक दर्जापर्यंत उंचावण्याचे उद्दिष्ट
पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ‘प्लेसमेकिंग’ हा अत्यंत नाविन्यपूर्ण प्रकल्प असून त्यामध्ये नागरी पुनर्रचनेच्या माध्यमातून रहिवाशांचे राहणीमान जागतिक दर्जापर्यंत उंचावण्याचे उद्दिष्ट आहे. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे व त्यांच्या गरजेनुसार त्यांना परवडणार्या बाबी, अल्पावधीत व कमी वापरलेल्या जागांवर तयार करणे हा प्लेसमेकिंग उभारणीमागचा दृष्टिकोन आहे.
मोकळ्या जागांचा विकास
वापरात न आलेल्या, अविकसित जमिनीचे तुकडे, विकसनसंबंधी नियमांच्या मर्यांदांमुळे उद्याने वा इतर उपक्रमांसाठी विकसित करण्यासाठी पात्र ठरल्या नाहीत अशा मोकळ्या जागांचा विकास करून त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांच्या बदलत्या गरजा आणि जीवनशैलीला साजेशा सार्वजनिक सुविधा पुरवणे, हे प्लेसमेकिंग या उपक्रमाचे लक्ष्य आहे. कमी वापरल्या जाणार्या जागांचे चैतन्यमय ठिकाणांमध्ये रूपांतरण करणे त्यात अभिप्रेत आहे.
प्लेसमेकिंगचे पथदर्शी प्रकल्प
विरंगुळा व ध्यान धारणा, नवनिर्मिती, पर्यावरण, ई-लर्निंग आणि कौशल्य विकास अशा विषयांवर आधारित प्लेसमेकिंगचे पथदर्शी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांसाठी प्लेसमेकिंग प्रकल्पातील स्थळांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.