पुण्यश्लोक अहिल्यादेवी उत्सवानिमित्त शोभायात्रा

0

धुळे । राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या जयंतीनिमित्त दि.31 रोजी धनगर समाज बांधवांनी मोटरसायकल रॅलीसह शोभायात्रा काढून येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला.बुधवारी सकाळी प्रभाकर टॉकीज परिसरात असलेल्या खंडेराव महाराज मंदीरापासून मोटरसायकल रॅलीसह शोभायात्रा काढण्यात आली.

हजारो समाजबांधवांचा समावेश
या शोभायात्रेत जि.प.समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, धुळे जिल्हा धनगर समाजातील ज्येष्ठ नेते सुनिल वाघ, विठ्ठल मारनर, गोपाल माने, आप्पा खताळ, नगरसेवक अमोल मासुळे, दादा खताळ, पंडीत मदने, राजेंद्र गर्दे, श्री द्वारकाधिश प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र शेलार, अण्णा सुर्यवंशी,नामदेव शेळके, जगन मासुळे, हमाल-मापाड्यांचे नेते गंगाराम कोळेकर, छोटू थोरात, संदीप सरग, बाळू शेंडगे, अशोक गिळे, संदीप खरात, विनोद खेमनार, मोहित कोळपे, विनोद शेंडगे, राजु डोंगले, कैलास मासाळ, प्रशांत मदने, राकेश खेमनर, सतिष खताळ आदींसह हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. हातात पिवळे ध्वज आणि धनगर समाजातील युवकांनी बारापाऊलीच्या तालावर धरलेला ठेका हे या शोभायात्रेचे आकर्षण होते.