पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन

0

भुसावळ। जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे राजीव गांधी वाचनालयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर तथा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रघुनाथ सोनवणे व जे.बी. कोटेचा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रसिंग चौधरी, प्रविणसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, सलिम गवळी, नितीन पटाव, जगपालसिंग गिल, डॉ. नईम मजहर, विनोद शर्मा, जितेंद्रसिंग चौधरी, दलजितसिंग चौधरी, विजयसिंग चौधरी, यु.एल. जाधव, विवेक नरवाडे, सायराबानो, यास्मिनबानो, कल्पना तायडे आदी उपस्थित होते.

यावल – तालुक्यातील पाडळसे येथील महादेव वाडी (धनगरवाडा) येथे राजमाता आहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पुजन सरपंच योगराज बर्‍हाटे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर तायडे, पोलीस पाटील सुरेश खैरनार, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश लोहार, प्रभाकर तायडे, एकनाथ कचरे, प्रकाश कचरे, दामोदर कचरे, विजय कोळी, शांताराम कचरे, सुधाकर कचरे, सुधाकर हटकर, जितेंद्र कचरे, गणेश कचरे, प्रशांत तायडे, केतन कचरे, समाधान कचरे यांसह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.