हैदराबाद । मुंंबई टिमच्या ओपनर लेंडल सिमन्स व विकेट किपर पार्थीव पटेल यांना पुणे टिमचा गोलंदाज जयदेव उनाडकडट यांच्या भेदक मार्यामुळे दोघांना तंबूत माघारी परतावे लागले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पुण्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला होता. रोहितच्या फटकेबाजीच्या जोरावर 6 षटकात 2 बाद 32 धावांपर्यंत मजल मारली. मात्र अॅडम झम्पाने केलेल्या गोलंदाजीमुळे अवघ्या 24 धावांवर समाधान मानावे लागले. आयपीएल 10 च्या अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्या मुंबई इंडियन्सने सुरुवात झाली आहे. जयदेव उनाडकटच्या भेदक मार्यासमोर पार्थिव पटेल (4), लँडल सिमॉन्स (3) हे मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी परतले तर अॅडम झंम्पाच्या भेदक मार्यासमोर रोहित शर्मा (24), किरॉन पोलार्ड (7) यांचा टिकाव लागला नाही. त्यातच अंबाती रायडू (12), कर्ण शर्मा (1) धावबाद झालेत. मुंबई टिमकडून पुणे संघाला 130 धावांचे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्रातील या दोन्ही संघांची झुंज अर्थात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. सामन्याच्यानिमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. पण प्रत्यक्षात पुण्याने यंदा मुंबईला तीनदा धूळ चारली आहे. यावेळी धुळ चारेल असेही सर्वत्र दिसून येत आहे. फायनल मात्र नव्याने खेळली जाणार असल्याने सर्व पराभवांचा वचपा काढण्याची मुंबईला सुवर्णसंधी असेल. दोन वेळेचा विजेता मुंबई संघ एकूण चौथ्यांदा अंतिम सामना खेळत होता. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, अंबाती रायुडू यांना फायनल जिंकण्याबाबत अभ्यास केला असल्याचे दिसून येत आहे. 2013 आणि 2015 च्या विजेत्या संघातही हेच खेळाडू होते. मुंबईची ताकद त्यांची राखीव फळी आहे. जोस बटलरचे स्थान लेंडल सिमन्सने घेतले. मिशेल जॉन्सनच्या जागेवर मिशेल मॅक्लेनघन आला असून त्याने 19 गडी बाद केले आहेत. नितीश राणा याने 333 धावा काढल्या. तो यंदाच्या स्पर्धेचा स्टार मानला जातो. जखमेतून सावरलेला रायुडू अधिक प्रभावी दिसतो. हरभजनसिंग अनुभवी असला तरी व्यवस्थापनाने कर्ण शर्मावर अधिक विश्वास व्यक्त केला.
मुंबईसाठी सामना अवघड
पुण्याच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यामुळे मुंबईला पहिल्या 5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ 16 धावा जमवता आल्या होत्या. तर 14 षटकांत सात खेळाडूंचा बळी देत फक्त 79 धावांपर्यंत मजल मारली होती. तिसर्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-10 च्या निर्णायक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचे अवघड आव्हान राहील असे समजले जात होते. मात्र मुंबई प्रत्यक्षात मैदानात धावांचे तर सोडाच बळींची संख्या रोखता आले नाही. पुण्याच्या धडाकेबाज गोलंदाजामुळे मुंबईल अवघ्या 129 धावात 8 खेळाडू गमावले होते.