पुणे : वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भूगाव, पुणे रंगली आहे. शनिवारी पुण्याच्या अभिजित कटकेने आपल्या शक्तीचे प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरीतदेखील कायम ठेवले. अभिजितने कोल्हापूरच्या महेश वरुटे वर 10-0ने मात केली. महेशला विजयाची एकही संधी न देता 10-0 ने मात करून उपांत्य फेरी गाठली.