पुणे। पुण्याच्या टेनिसपटू ऋतुजा भोसलेने अमेरिकेतील दुहेरीच्या आंतरमहाविद्यालयीन दुहेरीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. रशेल पिअर्सन हिच्या साथीत तिने ही कामगिरी केली. विद्यापीठाच्या इतिहासात ती सर्वोच्च ठरली आहे. ऋतुजा शेवटच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. इंटरकॉलेजिएट टेनिस असोसिएशन’ची (आयटीए) क्रमवारी तीव्र चुरशीने ठरते. रशेलने 2015 मध्ये इव्हा पाल्मा हिच्या साथीत पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. हा उच्चांक तिने ऋतुजाच्या साथीत मोडला.
उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार
ऋतुजाने फेब्रुवारीच्या प्रारंभी एसईसचा ’आठवड्यातील सर्वोत्तम खेळाडू (प्लेयर ऑफ दी विक) हा पुरस्कार पटकावला होता. तिच्या कामगिरीमुळे टेक्सासला राष्ट्रीय सांघिक इनडोअर स्पर्धेत स्थान मिळाले होते. ऋतुजाने एकेरीच्या क्रमवारीतही 28 क्रमांक झेप घेत टॉप हंड्रेड’मध्ये स्थान मिळविले. ऋतुजा-रशेल यांच्या कामगिरीमुळे टेक्सासने साउथइस्टर्न कॉन्फरन्स’ (एसइसी) केंटुकीवर 4-2 अशी मात केली. गेल्या आठवड्यात त्यांनी सहावे स्थान मिळविले होते. 24 विजय आणि आठ पराभव अशी त्यांची कामगिरी होती. ऋतुजाने एकेरीत 18 विजय-11 पराभव, तर दुहेरीत 12 विजय-8 पराभव अशी कामगिरी केली आहे. तीन बहुतांश सामने दुसर्या क्रमांकावर खेळली आहे. ऋतुजाने तेव्हा एकेरी व दुहेरी मिळून सर्व सहा सामने जिंकले होते.