पुण्याचे नगरसेवक इंदौरच्या दौर्‍यावर

0

पुणे :  केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग 2 वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणार्‍या इंदौर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदौर दौर्‍यावर जाणार आहेत. तिथे ते शहरात स्वच्छता कशी ठेवायची याचा धडा गिरवणार आहेत. यासाठीच्या खर्चाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

समितीमध्ये विषय मंजूर होण्यापूर्वीच दौर्‍यावर येऊ इच्छिणार्‍या नगरसेवकांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात उल्लेखनीय काम करणार्‍या महापालिकेला शहर स्वच्छतेमध्ये मात्र या सर्वेक्षणात फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचे कारण नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही हेच आहे. हे कारण दूर व्हावे व नगरसेवकांनी नागरिकांना समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढवावा म्हणून या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.