पुण्याचे हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

0
गिरीश बापट यांना सुबुध्दी द्यावी याकरिता गगणरायाला घालणार साकडे
पुणे : पुण्याला हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे अशी ठाम मागणी असून या हक्काकरिता पालकमंत्री गिरीश बापट यांना विघ्नहर्त्या गजाननाने सद्बुद्धी द्यावी याकरिता ग्रामदैवत श्री कसबा मंदिराच्या समोर भजन करून साकडे घातले जाणार आहे , असे माजी आमदार मोहन जोशी यांनी आज शुक्रवारी जाहीर केले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या पाण्याचा अगदी खेळखंडोबा केला आहे आणि पालकमंत्री बापट हे फक्त पाणीकपात एवढेच सूत्र धरून बसले आहेत. पुण्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आलो असून यापुढेही पुणेकरांच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
पुण्याची लोकसंख्या निश्चित करून नेमकी बाजू जलसंपदापुढे मांडण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आले आहे. ऐन दिवाळीत पाणीकपात करून पुणेकरांचा सणाचा आनंद हिरावून घेण्याचा प्रकार या सत्ताधाऱ्यांनी केला. मध्यंतरी जलसंपदा खात्याने पुण्याचे पाणी तोडले, कालवा फुटी झाली आणि पाणीटंचाई सोसावी झाली. अजूनही पाण्याबाबत खेळखंडोबा चालू आहे. पाणी कोटा वाढवावा अशा मागणीचा स्टंट करून पुण्यातील भाजपचे आठही आमदार गप्प आहे. हा प्रकार संतापजनक आहे. यापूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, अतिवृष्टी झाली पण पुण्याच्या पाण्याबाबत एवढा गोंधळ काँग्रेस सरकारने कधी घातला नव्हता, असेही जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.