मुंबई । शिवशंकर उत्सव मंडळ, डिलाईल रोड आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शिवशंकर श्री किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने मिळवला. महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर रविवारी झालेल्या स्पर्धेत किताबासाठी महेंद्रसह मुंबईचा सागर कातुर्डे, पालघरचा रितेश नाईक, पुण्याचा सचिन खांबे, मुंबई उपनगरचा आदित्य झगडे, ठाण्याचा नितीन म्हात्रे आणि मुंबई उपनगरचा नितीन शिगवण यांच्यात चुरस होती. त्यात पंच आणि उपस्थित लोकांनी महेंद्र चव्हाण याला पसंती दर्शवली. किताब विजेत्या महेंद्र याला रोख 51 हजार रुपये आणि मशिवशंकर श्री किताबाने सन्मानित करण्यात आहे. मुंबई उपनगरचा अभिषेक खेडेकर सर्वोत्तम प्रदर्शक (बेस्ट पोझर) ठरला. त्याने रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील शंभरहून अधिक शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते.आमदार सुनील शिंदे, माजी महापौर आणि नगरसेविका स्नेहल आंबेकर तसेच भारत श्री विजय पाटील याच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना गौरवण्यात आले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
55 किलो वजनी गट – नितीन शिगवण, राजेश तारवे, ओंकार आंबोलेकर (तिघेही मुंबई उपनगर), उपेंद्र पांचाळ (मुंबई), रोहित सहानी (ठाणे). 60 किलो गट : नितीन म्हात्रे (ठाणे), संदेश सकपाळ (मुंबई उपनगर), बप्पन दास (मुंबई उपनगर), तुषार गुजर (मुंबई), विजार लाड (मुंबई उपनगर). 65 किलो गट : आदित्य झगडे (मुंबई उपनगर), वैभव महाजन (मध्य रेल्वे), उमेश पांचाळ (मुंबई), संदीप पाटील (ठाणे), जगदीश कदम (मुंबई उपनगर). 70 किलो गट : सचिन खांबे (पुणे), श्रीनिवास खारवी (ठाणे), प्रदीप झोरे (मुंबई), गणेश आमुर्ले (ठाणे), चिंतन दादरकर (मुंबई). 75 किलो गट : रितेश नाईक (पालघर), विघ्नेश चंडीला (मुंबई उपनगर), रवींद्र वंजारी (जळगाव), अमोल गायकवाड (मुंबई उपनगर), महेश शेट्टी (दोघेही मुंबई उपनगर). 80 किलो गट : सागर कातुर्डे (मुंबई), सुशील मुरकर, अभिषेक खेडेकर, सुधीर लोखंडे, रोहन कांदळगावकर (सर्व मुंबई उपनगर). 80 किलोवरील गट: महेंद्र चव्हाण (पुणे), सकींदर सिंग (मुंबई उपनगर), सुशांत रांजणकर (मुंबई), रसेल दिब्रिटो, विजय जाधव (दोघेही मुंबई उपनगर).