पुण्याच्या सीमा भागातील ३४ गावांचा महापालिकेत समावेश

0

मुबई : पुणे महानगरपालिकेच्या सीमा भागातील ३४ गावे पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ठ करण्याबाबत प्राथमिक अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली असून, त्या हरकती सुचनांवर विभागीय आयुक्त पुणे यांनी सुनावणी घेतली आहे. त्या अहवालाची तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.

पुणे महापालिकेच्या सीमा भागातील ३४ गावे महापालिका हद्दीत समाविष्ठ करणे बाबतचा प्रश्न सदस्य तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्याला मुख्यमंत्रयानी लेखी उत्तर दिले आहे. सीमा भागातीलन ३४ गावे पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ठ करण्याबाबत २९ मे २०१४ रोजी प्राथमिक अधिसुचना प्रसिध्द करून हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. ही गावे पुणे महापालिकेत समाविष्ठ करण्यात बाबत तसेच समावेश होऊ नये म्हणून विनंती व निवेदन प्राप्त झालेली आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी घेऊन विभागीय आयुकत पुणे विभाग यांनी सादर केलेल्या अहवालाची तपासणी करण्यात येत आहे असे मुख्यमंत्रयानी लेखी उत्तरात म्हटले आहे.