पुण्यातील अनोखा रानभाजी महोत्सव

0

चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l
रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll
या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणमुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण भीमाशंकर डोंगराईत असलेल्या आहुपे या गावात दर पावसाळ्यात असते.

या गावात गेली 2 वर्षे वनवासी कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी रानभाजी महोत्सव अशी एक नावीन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते. आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात. आपल्या सर्व आदिवासी भगिनींना आणि मातांना या भाज्यांचे विविध गुण माहीत आहेत व त्या विविध प्रकारे शिजवण्यातही पारंगत आहेत. भाज्यांची स्पर्धा घेऊन उत्तम सादरीकरण आणि स्वाद आणि माहिती असणार्‍या या जनजाती समाजातील स्पर्धकांना बक्षीसे देण्यात येतात. वनस्पती शास्त्राचे नामवंत लोक परीक्षक म्हणून असतात. पुण्यातून आपण बर्‍याच लोकांना सहल म्हणून या ठिकाणी घेऊन जातो, नाम मात्र शुल्क असते, स्पर्धेच्या ठिकाणी घरटी काही लोकांना चुलीवर शिजवलेले अन्न व रानभाजी, नाचणी सत्व असा आस्वाद घ्यायला मिळतो. जमा केलेल्या शुल्कातील काही रक्कम घरटी कातकरी कुटुंबाला दिली जाते. यानिमित्ताने आहुपे हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊन, सहलीस येणार्‍या पाहुण्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाच्या सोयीतून त्यांना रोजगार मिळावा ही कल्याण आश्रमाची मूळ इच्छा. आश्रमाच्या माध्यमातून तिथे चालू असलेल्या बचत गटाच्या काही गोष्टी जसे, हातसडीचा तांदूळ, अस्सल नाचणी, लोणची, कुरडई, पापड, मध विकायला ठेवलेला असतो. एकंदरीत या मस्त खुशाल आणि निवांंत गारव्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला आवडेल ना!!!

रानभाजी तारखा:-
12 व 13 ऑगस्ट 2017 – आहुपे 19 व 20 ऑगस्ट 2017 – कुकडेश्वर 26 व 27 ऑगस्ट 2017 – तळेरान प्रवास सुरुवात शनिवारी दुपारी 4 वाजता व परत ठरलेल्या पुण्यातील ठिकाणी रविवारी रात्री. प्रत्येक व्यक्तीचे शुल्क 2000/-
पैसे जमा करण्यासाठी – खालील खात्यावर
कृपया जमा करावेत.
Vanvasi Kalyan -hsram , Maharashtra
Bank Of Maharashtra, Chinchwad Branch, Pune
Account Number- 20160364136,
IFSC Code – M-HB0000127
PAN NO- AAATV3624K
पैसे जमा करताना ठरपलहरक्षळ असा संदर्भ लिहावा, व खालील संपर्क दिलेल्या व्यक्तींना डचड किंवा ुहर्रीीीिं वरच आपले नाव, पत्ता, जमा केलेली रक्कम व लोकांची संख्या कळवावी.

समाविष्ट करण्यात येणार्‍या लोकांची संख्या मर्यादित असणार आहे. एकूण प्रवास, बस कुठे येणार वगैरे गोष्टी काही दिवसात विस्तृत स्वरूपात कळवण्यात येतीलच. या कार्यक्रमासाठी तयारी व अंमलबजावणीसाठी काही स्त्री व पुरुष स्वयंसेवकांची गरज आहे, तेव्हा ही माहिती प्रसारित झाली की लवकरात लवकर आपली व आपल्या मित्र-मैत्रिणींची नावे सहलीसाठी व कार्यकर्ता म्हणून नोंदवण्यासाठी कृपया तयार राहा.

टीप – अशा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तेथील स्वच्छता, शुद्धता यास बाधा न आणता, त्याचे अधिक संवर्धन कसे करता येईल हे आपले प्रथम कर्तव्य आहे. प्लास्टिक पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा इतरत्र टाकण्यास सक्त मनाई आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अंजली घारपुरे- 9604622628, वैशाली जोशी – 9552558197, नरेंद्र पेंडसे – 7709013232, विजय भालिंगे – 9225302055, सचिन दीक्षित – 9822082444, ऋषभ मुथा – 9850258408, सचिन कुलकर्णी – 9921574108.

– अंजली घारपुरे,
9604622628
वनवासी कल्याण आश्रम, पुणे