पुण्यातील अभियंत्याचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; गुन्हा दाखल

0

पुणे-पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी संगणक अभियंत्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल शनिवारी रात्री उशिरा समोर आली. आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासह अनैसर्गिक कृत्य केले आणि नग्न फोटो स्वतःच्या मित्राला पाठवले होते.

नग्न फोटो फेसबुकवर व इतर सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन ये अशी मागणी देखील पती करायचा असे तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी पती हा हिंजवडीमध्ये नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहे, तर पत्नी ही उच्चशिक्षित असून गृहिणी आहे.

याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने पतीसह,सासरे आणि नणंद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत करत आहेत.