पुणे :– पुण्यातील संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयात आज सकाळी आग लागली. या आगीत कार्यालयातील काही कागदपत्रे जळाली आहेत. या घटनेचे वृत्त मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत दहा ते पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले.
पुण्यातील संगम पुलाजवळ आरटीओ कार्यालयाची दुमजली इमारत असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कागदपत्रांच्या गठ्ठ्यामध्ये आग लागल्याचे तेथील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. त्याने ही माहिती फोनद्वारे अग्निशामक दलाला कळवली व त्यानंतर तातडीने दाखल झालेल्या तीन अग्निशामक दलाच्या गाड्यांनी काही पंधरा मिनिटात आग विझवली. परंतू आग लागलेल्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आरटीओशी संबंधित कागदपत्र जळाले असल्याचे अग्निशामक दलाचे जवान भिलारे यांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.