पुण्यातील उपनगरासह 22 परिसर सील

0

पुणे: पुण्यात कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरात महापालिका आणि पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. शहर आणि काही उपनगरांतील आणखी 22 परिसर पूर्णपणे सील करण्यासाठी पालिका प्रशासनाने पोलिसांकडे या परिसरांची यादी दिली आहे. त्यावर तातडीने अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुलटेकडी ते सर्व पेठा आणि आरटीओपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. तर, येत्या काळात आणखी कठोर पाऊल उचलण्याचे संकेत पालिका आयुक्तांनी त्यावेळी दिले होते. त्यावर आणखी 22 परिसर सील करण्यात आल्याने या भागातील जनतेला आता अत्यावश्यक सेवांसाठीदेखील बाहेर पडता येणार नाही.

हे 22 ठिकाण सील प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन 1 ते 48 व परिसर आणि ताडीवाला रोड प्रभाग 20, संपूर्ण ताडीवाला रोड, घोरपडी गाव, विकास नगर, बालाजी नगर, श्रीवास्तवनगर प्रभाग 2, राजेवाडी, पडमजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टँड, संत कबीर, A. D. कॅम्प चौक, क्वाटर गेट,भवानी पेठ प्रभाग 20, विकासनगर वानवडी गाव, लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड, चिंतामणी हंडेवाडी रोड प्रभाग क्रमांक 26 व 28
, घोरपडी गाव, बी.टी. कवडे रोड
, संपूर्ण लक्ष्मी नगर, रामनगर जवाहरलाल नगर, येरवडा प्रभाग 8
, पर्वती दर्शन परिसर, सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे रूळ डावी बाजू व उजव्या बाजूस नरवीर तानाजी वाडी चौक ते पुणे शिवाजीनगर एस टी स्टँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्वे न., मज्जीदचा भागाचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न ता. वाडी, मनपा शाळा क्रमांक 47 परिसर दोन्ही बाजू, संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग 14, संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग 7
, NIBM रोड कोंढवा प्रभाग 26, संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर,संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर, साईनगर कोंढवा प्रभाग 27, संपूर्ण विमान नगर प्रभाग 3, वडगावशेरी परिसर प्रभाग 5, धानोरी प्रभाग 1, येरवडा प्रभाग 6, संपूर्ण कोंढवा बुद्रुक आदी परिसर सील करण्यात आले आहे.