पुण्यातील कोरोना बळीची संख्या 31 वर

0

पुणे: कोरोनाने जगभर अक्षरशःथैमान घातले आहे. भारतात दररोज रुग्ण संख्येत मोठी वाढ होतांना दिसत आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. पुण्यातही कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 31 वर गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. भाजीपाला, फळे विक्री बंद आहे.