पुण्यातील गणेशोत्सवासाठी स्वतंत्र संकेतस्थळ

0

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेने पुण्यातील गणेशोत्सवाबाबतची अद्ययावत माहिती देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ आणि अ‍ॅपची तसेच स्वतंत्र सोशल मिडिया पेजेसचीही निर्मिती केली आहे. या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यास मदत होणार आहे.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य वर्षाच्या निमित्ताने महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देश-विदेशातील नागरिकांना हा सोहळा घरबसल्या अनुभवता यावा यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न चालू आहे. नुकताच पालिकेतर्फे ोीूर125.ळप या संकेतस्थळाती व चेीूर125 या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून सोशलमिडीयावर स्वतंत्र पेजेसही तयार करण्यात आले आहे. या सर्व डिजीटल माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव जगभरात पोहोचविण्यात येत आहे. सोशल मिडियावर स्वतंत्र पेजेसही तयार करण्यात आले आहे. या सर्व डिजीटल माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव जगभरात पोहोचविण्यात येत आहे. मनपाच्या गणेशोत्सवादरम्याच्या सर्व उपक्रमांची माहिती, वाहतूक व्यवस्थेतील बदल, मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांची माहिती आणि लाईव्ह आरती, ढोल पथकांची माहिती, नकाशातील स्थानासह सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणांची तसेच विसर्जन हौदांची माहिती अ‍ॅप आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय छायाचित्रे, व्हिडिओ, गणपतीची मराठी आणि अर्थासह इंग्रजी भाषेतील आरती आदी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील गणेशोत्सव जगभरातील नागरीकांना पाहता यावा यासाठी पालिकेने तयार केलेल्या संकेतस्थळावर पुण्यातील गणेश मंडळांनी त्यांच्या गणेश मंडळाचा यावर्षीचा देखावा, आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्य आदी बाबतची माहिती पाठवावी असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.