पुणे:- देशासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्यसरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात चौथ्या लॉकडाउन नंतर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार असल्याचा मेसेज पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या मुळे शहरातील नागरिक आवश्यक त्या वस्तूंचा साठा करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी पत्रकार परिषद घेत हा मॅसेज चुकीचा असून शहरात मुबलक प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा साठा असल्याची माहिती दिली आहे.
तसेच कंटेन्मेट झोनमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती काळजी घेतली गेल्याने काही दिवसांमध्ये 21 ठिकाणची रुग्णसंख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नॉन कंटेन्मेट झोन मध्ये खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्यामुळे अशा ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी स्वतः योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्या6 आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे- मुंबई सारख्या शहरात लष्कर तैनात केले जाणार असल्याच्या वृत्तामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लष्कराला असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही. लष्करानेही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे लष्करातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Prev Post
Next Post