पुणे:- केंद्रसरकरने लॉक डाऊन शिथिल करत 8 जुन पासून काही नियम, तसेच सम- विषम दिवसाला दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सध्या पुण्यातील दुकानांमध्ये शिरल्यावर स्वदेशी माल कुठला, विदेशी माल कुठला याच्या पाट्या लावलेल्या दिसत आहे.
पुण्यातल्या ग्राहक पेठेत स्वदेशी आणि विदेशीची पाट्या लावण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना स्वदेशी उत्पादने कोणती आणि विदेशी उत्पादने कोणती? हे समजत नाही. ते ग्राहकांना लक्षात यावे आणि त्यांनी जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादने घ्यावीत असे पुणे ग्राहक पेठेच्या एमडींनी सांगितले. भारतीय पदार्थ ग्राहकांनी जास्तीत जास्त घ्यावेत असाही आमचा उद्देश आहे. जेणेकरुन आत्मनिर्भर भारत या मोहिमेला हातभार लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या मोहिमेचा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्राहकपेठेत पाट्या लावण्यात आल्या आहेत. स्वदेशी वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या जाव्यात यासाठी आम्ही हे सुरु केल्याचं ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी स्पष्ट केलं.