पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंग; सहा जणांवर गुन्हा दाखल

0

पुणे- देशभरात रॅगिंग करणे हा गुन्हा मानला जात असून तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते असे असतांना पुण्यातील एका नामांकित आभियांत्रिकी महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांवर रॅगिंग आणि मारहाण केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील एका नामांकित आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत असलेल्या दोन विद्यार्थ्यांवर त्याच वसतीगृहातील सहा विद्यार्थ्यांनी रॅगिंग करत बेदम मारहाण केली. संशयित आरोपींनी तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांच्या खोलीस प्रवेश करुन त्यांच्या डोक्यात आरसा फोडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्हाला भाई म्हणून नमस्कार करायचा अशी धमकी दिली. आरोपींच्या मारहाणीत तक्रारकर्ते विद्यार्थी जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.