पुण्यातील बिल्डरकडून नागरिकांची फसवणूक

0

जळगाव । पुण्याच्या परीसरात असलेल्या सातमजली अपार्टमेंटमध्ये ‘वन बीएचके’ फ्लॅट देण्याच्या नावाखाली जळगाव, बुलडाणा आणि नगर जिल्ह्यातील 450 लोकांची सुमारे 103 कोटी रुपयांत फसवणूक केल्याची तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात या पुण्यातील स्कीमचा प्रमुख बिल्डर सुमीतकुमार भालोटिया याच्यासह 11 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालोटिया याची ‘स्पार्क रिअ‍ॅलिटी’ ही कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भालोटियासह स्थानिक ब्रोकर्सनी 14 जून 2014 पासून डोंगरगाव परिसरात फ्लॅट, प्लॉट बुकिंग सुरू केली होती.

11 जणांवर गुन्हा दाखल
सोमाणी यांच्यासह जळगावात राहणार्‍या अनुसया खंबालकर, अंकित काबरा, विनय काळे, हरी चौधरी, योगेश टेणी, मिलिंद पाटील, मनीषा पाटील, खंडेराव सोनवणे, गणेश कोष्टी आदींनी फ्लॅट बुक करून पैसे भरले होते. सोमाणी यांनी पैसे तसेच फ्लॅट मिळत नसल्यामुळे प्रत्यक्ष साइटवर जाऊन चौकशी केली असता, त्यांना काही गुंडांनी धमकी दिली. ‘भालोटियाचा या साइटशी काही संबंध नाही; परत आले तर हात-पाय तोडून टाकू’ या भाषेत सोमाणी यांना धमकावण्यात आले. अखेर 10 मे रोजी सोमाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात भालोटिया याच्यासह ज्योती भारतीया, तुषार राऊत, फईम तांबे, बिजल कोठाडिया, राहुल पाटील, प्रदीप पाटील (बालाजी एंटरप्रायजेस), हेमंत न्याती, मनोज लढ्ढा, बालेश कोतवाल, देवेंद्र बारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालोटियाशिवाय इतर संशयित हे त्याच्या कंपनीचे कर्मचारी ब्रोकर्स आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.