पुणे : हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव ही दोन कुटुंब बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव हे दोघे आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले आहे. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या अॅक्वेरियस हॉटेलात मुक्काम केला. मात्र, बुधवार सकाळपासून त्यातील 5 जणांचे फोन बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.