पुणे:मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी पुन्हा याला चार आठवडे स्थगिती देण्यात आली. त्यामुळे मराठा समाजात मोठा असंतोष आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गंभीर नाही असे आरोप होत आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोंसले यांच्या पुढाकाराने पुण्यात मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र अचानक ही परिषद रद्द करण्यात आली. आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही परिषद होणार होती, ती रद्द झाली आहे.
मराठा आरक्षणाबाबत प्रथमच खासदार उदयनराजे भोंसले यांनी पुढाकार घेऊन परिषद आयोजित केली होती. यासाठीचे कारण अद्याप देण्यात आलेले नाही.