पुण्यातील येरवडा कारागृहातील पोलीस अधिकार्‍यावर गोळीबार

0
पुणे । येरवडा कारागृहातील तुरुंग अधिकारी पाटील यांच्यावर आज सकाळी भर रस्त्यात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने पाटील या हल्ल्यातून बचावले. त्यांना गोळी लागली नाही. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेल रस्त्यावर हा प्रकार घडला. पाटील हे सकाळी त्यांच्या घरून कारागृहाकडे निघाले होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.