पुण्यातील सुरक्षारक्षकाच्या मारेकऱ्याला अटक

0

पुणे – ४ जूनला सुरक्षारक्षक कचरू गवळी याची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १००च्या घरात दुकाने तपासली तर अनेक वाहनांची झडती घेतली होती. परंतु पोलिसांना मारेकऱ्याचा पता लागत नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयीत ताब्यात घेतले होते. परंतु त्यांनी मृत कचरूचा मोबाईल व पैसेच चोरून नेले होते. त्यानंत सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून पोलिसांनी कात्रज येथून अश्विन गवळीला अटक केली.

आरोपीच्या म्हणण्यानुसार मृत कचरू आणि आरोपीत भांडण झाले होते. त्यावेळी आरोपीची दमदाटी झाल्याने त्याने कचरूची चाकू भोकसून हत्या केली. आरोपीला कोर्टाने २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र जे संशयित पकडले ते कोण याचा तपास आता पोलीस करत आहेत.