पिंपरी :- राज्यातील ८८ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली असून राज्य गृह विभागाने त्यांच्या बढतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ८ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
अजय रामराव कदम (पुणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), नंदकुमार दत्तात्रय सातव ( पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर), संजय भाऊसाहेब नाईक (पुणे शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी, उपविभाग जिल्हा सोलापूर ग्रामीण), नितीन जगताप (पुणे शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा उपविभाग, जिल्हा वर्धा), संदीप सुरेश शहा (ना.ह.स. पुणे ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, वर्धा), श्रीधर पांडुरंग जाधव (पुणे शहर ते टीआरटीआय नागपूर), विजयकुमार वसंतराव पळसुले (पुणे शहर-पोलीस उप अधीक्षक, नक्षल विरोधी अभियान (एस.ए.जी) नागपूर), मुकुंद राजाराम महाजन (पुणे शहर ते जिल्हा जात पडताळणी समिती, गोंदिया)
पुणे शहरात बढती मिळालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे
धनंजय रघुनाथ धोपावकर (ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर), सुशील हरिश्चंद्र इंगळे (बृहन्मुंबई ते राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे), राजेंद्र अनंत सावंत (पीटीएस खंडाळा ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर) आणि प्रदीप प्रभाकर आफळे (पीटीएस तासगाव, सांगली ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर).