पुणे: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून महाराष्ट्रातील ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला आहे. ड्रग्स प्रकरणी दिग्गज अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी झाली, तेंव्हा पासून ड्रग्स प्रकरण संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. दरम्यान आज पुण्यात पुणे पोलिसांनी दहा लाखांचा ड्रग जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. २१२ ग्रॅमचे मेफेड्रोन नावाचे ड्रग जप्त करण्यात आले आहे. दोन जणांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.