पुण्यात इंजिनिअर तरुणीला अडीच महिने घरात डांबून केला बलात्कार

0

पुणे-पुण्यातील २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात कोंडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अंधेरीचा रहिवाशी असून लग्नास नकार दिल्याने त्याने तरुणीला आपल्या घरात कोंडून ठेवले होते. अडीच महिन्यांनी आरोपीच्या तावडीतून पळ काढण्यात तरुणीला यश आले. तेथून पळ काढताच तरुणीने पुण्यातील आपल्या बहिणीचे घर गाठले आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानतंर पोलिसांनी कारवाई करत आरोपी सय्यद आमीर हुसेन याला त्याच्या अंधेरीमधील घरातून अटक केली.

एका सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. तरुणी एका वर्षांपूर्वी गोव्यातून पुण्याला शिफ्ट झाली होती. पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता तिला गोड पदार्थातून गुंगीचे औषध देण्यात आले होते. तरुणी शुद्धीत आल्यानंतर आरोपी हुसेनने तिला मोबाइलमध्ये बलात्कार करतानाचा शूट केलेला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केले. यादरम्यान तो सतत तरुणीवर बलात्कार करत होता. इतकंच नाही तर चामडी पट्ट्याने मारहाणही करत होता. त्याने तरुणीचं डेबिट कार्ड काढून घेत त्यातून ४० हजार रुपये काढून घेतले होते’, अशी माहिती ओशिवारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत ३० जूनला आरोपी हुसेनने आपल्या सोडून दिल्याचं सांगितलं आहे. ‘मात्र यादरम्यान तो सतत माझा पाठलाग करत होता. ३ जूनला त्याने फोन करुन घरी आली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. ३ जुलैला त्याने मला पुन्हा त्याच्या घरी जाण्यास भाग पाडलं’, असं तरुणीने तक्रारीत सांगितलं आहे.

आरोपी हुसेनला अंधेरी न्यायालयात हजर केलं असता त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तरुणीला देण्यात आलेलं गुंगीचं औषध तसंच व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेला मोबाइल मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.