पुणे:– शहरातील चांदणी चौकात एका रसायनाने भरलेल्या टँकरमधून रसायन गळतीमुळे या भागातील रहिवासी तसेच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. नागरिकांना ऍसिडच्या उग्र वासाने त्रास होऊ लागला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली.
पनवेल कडून कात्रजच्या दिशेने जात असलेल्या ऍसिडचा टँकर बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास चांदणी चौकात आला असता त्या मधून मोठ्या प्रमाणात ऍसिडची गळती होत असल्याचे लक्षात आले. या गळतीमुळे कोथरूड मधील काही भागात उग्र वास पसरला होता. या गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशीरा पर्यंत ही गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले. काही काळ या रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.