पुणे : पुण्यात एकाचवेळी १५ भटकी कुत्री मृतावस्थेत आढळली आहेत. हडपसरमधील म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाणे याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.