मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू आहे. आज दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्तांची संख्या आता 1380 वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस आकडा वाढत असल्याने चिंताजनक परिस्थितीत निर्माण झाली आहे. मुंबईत कोरोनाचे अधिक रुग्ण आढळुन आले आहे. पुण्यातही संख्या झपाटयाने वाढत असून मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे.