पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

0


पुणे : पुणे शहरात गुरुवारी (28 मार्च) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा असेही नमूद करण्यात आले आहे.

शहर आणि परिसरातील जलकेंद्रांच्या स्थापत्य आणि विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. पालिकेकडून दुरुस्तीचे कारण दिले जात असले, तरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असल्याने दर गुरुवारी शहरात अघोषित पाणीकपात केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागांतही पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यात यावे म्हणून पुणेकरांच्या पाण्यात कपात केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.