पुण्यात जुना बाजार चौकातील होर्डिंग कोसळले; तीन जणांचा मृत्यू

0

पुणे : शहरातील जुना बाजार चौकात असलेल्या होर्डिंग्जचा लोखंडी सांगाडा काढताना आज शुक्रवारी दुपारी तो कोसळला. या होर्डिंग्जमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून,यात आठ जण जखमी झाले आहेत. खासगी होर्डिंग्ज कंपनीचे लोक लोखंडी सांगाडा काढण्याचे काम करीत होते.

प्राप्त माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कडून जुन्या बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात ही दुर्घटना घडली. या होर्डिंगखाली सहा रिक्षा, दोन दुचाकी, एक मोटार दबल्या गेल्या असून या वाहनांमध्ये असलेले नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. शिवाय, एक मुलीचा पाय तुटला आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तीघांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या व पोलिस दाखल झाले आहेत. वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.