पुण्यात ट्रकने दुचाकींना चिरडले; ४ जणांचा मृत्यू !

0

पुणे : पिरंगुट घाटातून पौडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने उतारावर असताना २ ते ३ दुचांकींना धडक देत फरफटत नेले. या घटनेत दुचाकीवरील २ तरुण आणि २ तरुणींचा मृत्यू झाला. चालक मद्यधुंद ही घटना घडली. पुणे – पौड रस्त्यावर घडली आहे. बुधवारी रात्री लवळे फाट्यावर हा अपघात झाला.

वैष्णवी सोनवणे, पूजा पाटील, नागेश गव्हाणे, सुरज राठोड अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाला वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करुन पकडले. अपघात होत असताना वेगाने येत असलेला ट्रक सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.