पुणे : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. कार्यकर्त्यांनी शहरातील कुमठेकर रस्ता, कोथरूड परिसरात दगडफेक केली आहे. बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या या बंदला काही पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बस सेवा सुरळीत सुरू आहे. दुकाने, शाळा, महाविद्यालय सुरू आहेत. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुणे शहरात पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याकडे पोलिसांचे लक्ष राहणार आहे.