पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

0

पुणे- मागील १० दिवस ज्या बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली त्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुणे आणि मुंबईत या मिरवणुकांना विशेष महत्त्व असून राज्यभरातील नागरिक याठिकाणी बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी येतात.

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक खेळांचे सादरीकरण हे या मिरवणुकांचे विशेष आकर्षण असते. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. राज्यभरात या मिरवणुकांमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.