पुणे : मुंबईमधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबईपाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आहेत. गुरूवारी अचानक मनसेने आक्रमक होत राजारामपुलावरील फळविक्रेत्यांवर हल्ला करीत या विक्रेत्यांचे सर्व सामान, फळे रस्त्यावर फेकून दिली. या प्रकारामुळे येथील वातावरण तणावग्रस्त बनले होते.
महापालिकेला दिला होता अल्टिमेटम
फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला होता. मात्र या दोन दिवसात फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. तथापि मनसे पदधिकारी मुंबईत व्यस्त असल्याने पुण्यातील आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनसेकडून कालच सांगण्यात आले होते.