पुण्यात मराठ्यांची भव्य दुचाकी रॅली!

0

पुणे – 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार असून, त्यासाठी जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाजाने (पुणे जिल्हा) रविवारी भव्य दुचाकी रॅली काढली होती.

सकाळी गुलटेकडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली सातारा रोड, वडगाव, सिंहगड रोड, अलका चौक अशी डेक्कन येथे पोहोचल्यानंतर येथील छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप झाला.