पुण्यात युवकाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

0

पुणे । पुण्यातील तळजाई टेकडीवर प्रफुल्ल वानखेडे या युवकाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतिशय गरीब घरातला हा तरुण होता. त्याची आई घरकाम करते. पुण्यातील महापालिकेच्या स्वीमिंग पूलमध्ये प्रफुल्लचा बुडून मृत्यू झाला आहे. दत्तवाडी येथे राहणारा प्रफुल्ल हा महाविद्यालयात शिकत नोकरी करता होता. प्रफुल्लच्या मृत्यूमुळे त्याच्या घरावर शोककळा पसरली आहे.

दर रविवारी तो पोहायला जायचा. रविवारीही मित्रांबरोबर पोहताना तो बुडायला लागला, परंतु, कोणीही सुरक्षारक्षक तिथे नसल्यामुळे प्रफुल्लचा बुडून मृत्यू झाला. महापालिकेचा हा स्वीमिंग टँक असून ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.