पुण्यात रंगणार कुबेर समुहाचे स्नेहसंमेलन

0

– फेसबुकवरील विख्यात ग्रुपशी नामवंत साधणार संवाद
– शिवशाहीर पुरंदरे, डॉ. तात्याराव लहाने, हिंमतराव बाविस्कर, महेश म्हात्रे आदींची उपस्थिती

जळगाव । सोशल मीडीयाने जग अधिक जवळ येत चालले असून फेसबुकच्या आभासी जगताला आता वास्तवाचा होणार्‍या स्पर्शाने फेसबुक परिवारात जिव्हाळ्याची नाती व्हायला सुरवात झालेली आहे. याचेच प्रतिक म्हणजे फेसबुक वरील प्रसिध्द असलेल्या कुबेर समुहाचे द्वितीय संमेलन दिनांक दिनांक 11 व 12 फेब्रुवारीला रोजी पुण्यातील मंत्रा रिसोर्ट येथे होणार आहे. या संमेलनात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नेत्ररोगतज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने, शास्रज्ञ हिंमतराव बावस्कर तसेच आयबीएन-लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांच मार्गदर्शन लाभणार आहे तसेच प्रशासनात उत्तम कामगिरी करणारे डॉ रश्मी करंदीकर( उपपोलिस अधिक्षक ठाणे,), गणेश मिसाळ ( उपविभागीय अधिकारी धुळे) डॉ प्रविण हेंद्रे (अध्यक्ष मेडीकल असोशिएशन कोल्हापुर), माया मोटेगावकर (संगीत शिरोमणी) तसेच शैक्षणीक क्षेत्रात काम करणारे डॅरेल डीमेलो यांना कुबेर रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

दहा पुस्तकांचे होणार प्रकाशन

कुबेर समुहात लिखाण करणार्‍या ‘टॉप फाईव्ह’ लेखक व कवींचाही गौरव होणार आहे, संमेलनात डॉ. अशोक माळी, रमेश कलशेट्टी, नम्रता माळी पाटील, प्रतिभा टेकाडे, सौ.राणी कदम, ज्योती कुलकर्णी कट्टी, मिनाक्षी अडे, मनिष ज्ञानदेव कानडे व सुरेखा धनावडे आदी सदस्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संमेलनात कविता वाचन, नाट्यप्रयोग, शास्रीय संगीत, कॅम्प फायर आदी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. कला, साहित्य, चित्रकला आदी वैविधतेने नटलेल्या हा गृप असून मध्ये तब्बल 1500 सक्रीय सभासद आहेत. संगमनेर येथील प्रसिध्द उद्योजक व सामाजीक कार्यकर्तेे संतोष जगन्नाथ लहामगे हे गृपचे प्रमुख व्यवस्थापक असून त्यांच्याच संकल्पनेतून दिनांक 18 जुलै 2014 रोजी गृपची स्थापना झालेली आहे अवघ्या दीड वर्षात 1100 सभासद जुळलेले आहेत. सभासदांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यापासून कला साहित्य, इतिहास, चित्रकला आदी विविध विषयांचा खजिना येथे उपलब्ध आहे कुबेरच्या माध्यमातून! कुबेरमधील एक राणी कदम यांच पहिलच पुस्तक संमेलनात प्रकाशीत होणार असल्याबद्द्ल त्या फार आनंदीत आहेत त्या म्हणाल्या ‘कुबेर समुहात मिळणार्‍या सतत प्रोत्साहनामुळे लिखाणाला उर्जा मिळते.

संतोष लहामगेंची रोखठोक भूमिका

स्वतः संतोष लहामगे हे नवीन येणार्‍या सदस्यांचा परिचय, तसेच महाराष्ट्रातील विविध पुरातन मंदीरांचा शोध घेत त्यावर सातत्यपूर्व लिखाण करीत असतात. ‘तु ही कुबेर मीही कुबेर’ हे कुबेर समुहाचे घोषवाक्य असून विविध विषयांवर होणारी चर्चा,संवाद हे गृपच प्रमुख वैशिष्ट आहे. सभासदांच्या आजारपणात, सुखदुःखात धावून जाणे यामुळे गृप एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे. समुहात कुबेर हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली असून मानसीक ताण तणाव ते व्यापार उद्योग आदी विविध विषयांवर सदस्यांना हेल्पलाईन द्वारे मार्गदर्शन करण्यात येते. फालतूगीरी, कॉपीपेस्ट तसेच व्हॉटस अपवरील पोस्ट ला गृपमध्ये पोस्टींगला बंदी असून कचरा पोस्ट संतोष लहामगे सरळ डिलीट करत असतात त्यासाठी प्रसंगी रोखठोक भूमिका घेतात. त्यामुळे गुणवत्ता प्रधानता टिकून आहे. तसेच ग्रुपमधील महिला सदस्यांना गृपमध्ये सुरक्षीतता आहे की नाही याची वेळोवेळी पाहणी केली जाते. चुकीच वागणारा सदस्य कितीही मोठा असला तरी चुक करताच त्याला तात्काळ गृपच्या बाहेर केले जाते. या पार्श्‍वभुमिवर पुणे येथील संमेलनाला 380 सभासद येण्याची शक्यता आहे.

हेल्पलाईनसह अनेक उपक्रम

कुबेर समुहाच प्रथम संमेलन संगमनेर येथे झाले होते सदर संमेलनाला 267 सभासद उपस्थीत होते. सभासद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहभागामुळे संमेलन अतिशय गाजले होते. पुण्यात झालेल्या कुबेर वर्धापन दिनाला 162 सदस्यांनी उपस्थीती देवून तेथेही धमाल उडवून दिलेली होती. गृपचे प्रमुख एडमीन संतोष लहामगे यांनी सांगीतले की ‘’कर्नाटक, गोवा, गुजरात या लांबच्या राज्यातून व परदेशातून काही सदस्य सदर संमेलनात येत आहेत तसेच भविष्यात गृपमधील सक्रीय सद्स्यांचा आरोग्यवीमा, चांगल लिखाण करणार्‍या सदस्यांना पुस्तक लिखाणाला प्रेरणा तसेच सभासद पाल्यांसाठी प्रोत्साहन योजना राबणार असल्याचे कळवले आहे. समुह प्रमुख संतोष लहामगे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली पुणे येथील कुबेरमित्र संमेलनासाठी झटत आहेत