धुळे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांची धुळे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांची गेल्या मार्च महिन्यात वसई विरार महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.त्यांच्याजागी जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांची धुळे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याबाबत ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेशीत केले आहे.
धुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांची विरार वसई महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाली होती. पंरतु धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोणत्याही अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली नसल्याने आतापर्यंत गंगाथरण यांनीच पदभार सांभाळला होता.