पुण्यात लॉकडाऊन पूर्वीच तुफान गर्दी; खरेदीसाठी लांबच लांब रांगा

0

पुणे : पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १३ ते २३ जुलै दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. आवश्यक सेवा वगळता सर्व दहा दिवस बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन पूर्वीच पुण्यात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. खरेदीच्या निमित्ताने मोठी गर्दी झाली असून दुकानांसमोर अक्षरश: रांगा लागल्या आहेत. पुणेकरांनी सोशल डिस्टनसिंगला हरताळ फासले आहे.

पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये १३ ते २३ जुलै पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आधी तयारीसाठी ३ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र गर्दी होत आहे.