पुणे: पुण्यातील देवाची ऊरळी येथील साडी सेंटरला आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला. आगीत सेंटरमधील साड्या आणि इतर लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. देवाची ऊरळी गावातील राजयोग साडी सेंटरला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.