पुण्याला जिजाऊंचे नाव द्या-संभाजी ब्रिगेड

0

पुणे: पुणे शहराला जिजापूर नाव देण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडने सरकारकडे पत्राद्वारे मागणी केली. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली. त्यामुळे शहराला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

पुणे शहर वसवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा होता. त्यामुळे पुणे शहराचे नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. ‘पुण्याला जिजाऊंचा वारसा आहे. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली. पुण्याला घडवण्यात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यामुळेच शहराचे नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावे,’ असे संभाजी ब्रिगेडने पत्रात नमूद केले आहे.

भाजपा शिवरायांच्या आशीर्वादाने सत्तेत आला आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव पुणे शहराला द्यावे, अशी विनंती केली जात आहे.