पिंपरी । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी हा एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. त्या परिसरात माता रमाई यांच्या पुतळ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यात रमाई यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात रमाई यांचादेखील पुतळा उभारावा, अशी मागणी नगरसेवक त्रिभूवन यांनी केली आहे.