पुतीन यांचा आलिशान गुप्त व्हिला

0

जगात सर्वाधिक पॉवरफुल्ल नेते ठरलेले रशियाचे ब्लादीमीर पुतीन हे व्हॅकेशनमध्ये स्पेशल व्हिलामधील आलिशान सोयीसुविधा उपभोगत असतात. मात्र, रशियाच्या पोलादी पडद्यामुळे यासंदर्भातली माहिती कधीच बाहेर येऊ शकत नाही. फिनलंडच्या सीमेवर असलेल्या एका व्हिलाचे कांही फोटो रेनोव्हेशन सुरू असताना लिक झाले आहेत.

फिनलंड सीमेपासून 20 कि.मी.वर असलेल्या विबॉर्ग बेमधली ही इमारत पुतीन यांचा सिक्रेट व्हिला असल्याचे सांगितले जाते. अर्थात ही इमारत 1913 साली बांधली गेली असून ती फेमस वास्तूरचनाकार उनो उलबर्ग याने डिझाईन केलेली आहे.ही जागा आत्तापर्यंत गुप्तच होती. मात्र, 1987 मध्ये ती प्रकाशात आली. पुतीन यांना या जागेत 2010 नंतर बरेच वेळा पाहिले गेल्याचे सांगितले जाते. मास्को न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या इमारतीत पॅलेसप्रमाणे सुविधा केल्या गेल्या आहेत.