पुनखेडा शिवारातून नऊ हजारांच्या ठिबक नळ्या लांवबल्या

0

रावेर- पुनखेडा शिवारातील एका शेतातून चोरट्यांनी नऊ हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या लांबवल्या. रावेर पोलिस स्थानकात चोरीची नोंद करण्यात आली. पुनखेडा शिवारातील डॉ.एस.आर.पाटील यांच्या मालकीच्या गट नं.16 या शेतातील जैन कंपनीच्या नऊ हजार रुपये किंमतीच्या नळ्या चोरट्यांनी 16 रोजी रात्री लांबवल्या. मोहन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र नारेकर व सहकारी करीत आहेत.