रावेर- तालुक्यातील पुनखेडा येथील नरेंद्र उर्फ गुड्डू विनायक पाटील (39) या तरुणाने अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास गावाजवळ घडली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला. रावेरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुनखेडा येथील तरुण नरेंद्र हा मित्रासोबत नव्यानेच घेतलेल्या दुचाकीने घराकडे परत येत असताना गावानजीकच अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने नरेंद्र जागीच ठार झाला. या घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मृत नरेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.