पुनगावला दोन गटात हाणामारी 13 जणाना अटक

0

जळगाव। पाचोरा तालुक्यताील पुनगाव येथे जुन्या वादातून दोन गटात होणामारी होऊन परस्पर विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. 20 आरोंपीविरुध्द दंगल व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली. दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मीनाबाई आमले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या गल्लीत राहणारा बापू विठ्ठल परदेशी हा हातात तलवार घेऊन आला व त्यांच्याविरुध्द दाखल गुन्हा मागे घेण्यास सांगितले. अन्नपूर्णाबाई आमले, पती विनोद आमले यांना मारहाण केली. याबाबत बापू परदेशी, राहुल परदेशी, अनिल परदेशी, शोभाबाई परदेशी, वैशाली परदेशी, लताबाई परदेशी, सचिन परदेशी, सुनिता परदेशी, रुपाली परदेशी, सुशाबाई परदेशी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.